रेशन हा जनतेचा हक्क; एरोलीतील स्वस्त धान्य दुकानाविरोधात तक्रार

  1. रेशन हा जनतेचा हक्क; आयरोलीतील स्वस्त धान्य दुकानाविरोधात तक्रार
    प्रतिनिधी | रयत न्यूज
    नवी मुंबई : आयरोली नाका परिसरातील स्वस्त धान्य दुकान (U/MUM 41F 143) येथे लाभार्थ्यांना कमी रेशन देणे, बिल अथवा पावती न देणे, तक्रार नोंदवही उपलब्ध नसणे तसेच शासकीय धान्याच्या कथित गैरव्यवहाराबाबत संबंधित विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
    तक्रारीमध्ये संबंधित स्वस्त धान्य दुकानाची तातडीने अचानक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच e-POS व्यवहार, स्टॉक रजिस्टर, वितरण नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    आरोप सत्य आढळल्यास संबंधित दुकानदार व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच गरजू नागरिकांच्या हक्काचे धान्य कोणत्याही परिस्थितीत अपहार होऊ नये, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
    रेशन व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांच्या अन्नसुरक्षेशी निगडित असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. शासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    – रयत न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *